जिही निमिषमात्रे देह
1311.
जिही निमिषमात्रे देह पालटिला ।
स्त्रियेचाचि केला पुरुष उभा ॥१॥
त्यांचे नवल कोण तारिती जड जीवा ।
यालागी घडावा संतसंग ॥२॥
जिही फिरविले औंढयाचे देऊळ ।
बोलविले बोल मूर्तिकरवी ॥३॥
निळा म्हणे जिही प्रेते जिवविली ।
वरदे उपजविली बाळे स्त्रिया ॥४॥
