अंगी ऐश्वर्य येऊनि ब
1291.
अंगी ऐश्वर्य येऊनि बाणे ।
तुमचे भक्तींची लक्षणे ॥१॥
तै तो मान्य होय जगी ।
विश्व वंदी तयालागी ॥२॥
शांती क्षमा आलिया वस्ती ।
संतलक्षणाची प्रशस्ती ॥३॥
कामक्रोधामोडली चाली ।
सर्व भूती साम्यता झाली ॥४॥
तुटोन गेले आशापाश ।
नुरोनि कल्पना नि:शेष ॥५॥
निळा म्हणे नाही ममता ।
कृपा तुमची ते अनंता ॥६॥
