काही करी ना हा करवी
1295.
काही करी ना हा करवी ।
असोनि जीवी जीवविहीन ॥१॥
संतचि ओळखती यासी ।
जाणता आणिकासी दुर्लभ ॥२॥
बुध्दीचिये पाठी पोटी ।
न देखे शेवटी बुध्दी तया ॥३॥
निळा म्हणे सत्ता याचि ।
न देखे विरंची आणी रुद्र ॥४॥
1295.
काही करी ना हा करवी ।
असोनि जीवी जीवविहीन ॥१॥
संतचि ओळखती यासी ।
जाणता आणिकासी दुर्लभ ॥२॥
बुध्दीचिये पाठी पोटी ।
न देखे शेवटी बुध्दी तया ॥३॥
निळा म्हणे सत्ता याचि ।
न देखे विरंची आणी रुद्र ॥४॥