वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

नामयासारिखे निधान तु

🙏 4. संत नामदेव · ABH-082516 · अभंग क्र. १२९५

1295.
नामयासारिखे निधान तुझिये कुर्सी धन्य तू वो होसी जगामाजी ॥१॥
धन्य याचे सुख देखियेले डोळा | प्रेमाचा जिव्हाळा अलौकिक ॥२॥
धन्य तुझे कूस धन्य तुझा वंश | दीपासवे प्रकाश दिसे जेवी ॥३॥
धन्य तुझी काया धन्य वाचा मन | करविले स्तनपान नामयासी ॥४॥
धन्य हा दिवस तुवा केले सार्थक | खेळविले कौतुके नामयासी ॥५॥
धन्य तुझे भोजन नाही नाम्याविण | धन्य उदकपान केले तुवा ॥६॥
धन्य विश्रांतीसी केले त्वा | शयन वोसंगा घेऊन नामयासी ॥७॥
धन्य तुझे कर कुरवाळला नामा | धन्य तो संभ्रमा स्नेह तुझा ॥८॥
धन्य कृपादृष्टी नाम्याते पाहिले | केस कुर्बाळिले बाळपणी ॥९॥
ऐसी तू वो धन्य जन्मोनिया धन्य | तुझे नाम धन्य मिरवत ॥१०॥
धन्य तुझा नामा ज्याची भेटी आम्हा | धन्य त्याचा प्रेमा नित्य नवा ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग