वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 171. राजाई व नामदेव यांचा संवाद

घरधनि याणी केला गुरु

🙏 4. संत नामदेव · ABH-082848 · अभंग क्र. १३१३

1313.
घरधनि याणी केला गुरु |बाई मी आता काय करूं|असोनि नाहींसा संसारू | चमत्कार कृपेचा ॥१॥
धांवे पावे गे मेसाई येथे कोणाचे न चाले कांही |सत्यपण तुझे ठायी | तरी है नाहिसे करी गे ॥२॥
मंत्र घेतला जैसा | घरी संताचा बोळसा |बोस पडो हरिदासा | गेले नमत मागुते ॥३॥
काय सांगो याची रीती सोसे सोसे पाये चरणाप्रती |अवघे भांबडभूत होती | नाचताती आनंद ॥४॥
लौकिकांत गेली वाया एकाच्या एक पडती पाया |म्हणती ये गा पंढरिराया| ब्रह्मानंदे डुल्लता ॥५॥
भोळी सासू गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली पाही |त्याने जोडिला शेषशायी | काय राजाई करू म्हणे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग