शिवणे टिपणे करोनि आप
1300.
शिवणे टिपणे करोनि आपुले | नित्य चालवणे संसारिक ॥१॥
गणगोतांमाजी बरे केले नांव माझे सत्त्व सर्व बुडविले ॥२॥
कवणे गुणे तुज पडिली वा भुली | सुख या विठ्ठली देखिले काय ॥३॥
तू भक्त निघडा हा देव धडफुडा | मेळविला जोडा येरवेरा ॥४॥
यासी नाही आप तुज नाही पर | आमुचा संसार विभांडिला ॥५॥
सरले आयुष्य उरले थोडे दिस | थोर केली आस होती जीवी ॥६॥
आमच्या माघारे राखिसी वो नांव | त्वा तंव बरवे देव काढियेले ॥७॥
सांदिये भोपळा गळा तुळसीमाळा | जपसी वेळोवेळा रामकृष्ण ॥८॥
तेणे छंद नयनी अश्रूंचिया धारा केली ख्याति गव्हारा जनांमाजी ॥९॥
अरे ऐसे तुवा बुडविले कुळ | सांडिली सकळ लोकलाज ॥१०॥
बरवी धरिली दृढ सत्वाची पाउटी शिकवी दामशेठी नामवासी ॥११॥
