देव जाला नामा नामा ज
1297.
देव जाला नामा नामा जाला देव | गोणाईचा भाव पाहावया ॥१॥
हा घे तुझा नामा काय चाड आम्हा | आनंदाचा प्रेमा गोणाईसी ॥२॥
हाती धरोनिया घेऊनी चालिली फिरूनी पाहती जाली तंव तो देव ॥३॥
अगा माझ्या बापा तू कोणा हवासी मज दुर्बळासी काय होय ॥४॥
सोळा सहस्र मुख्य अष्ट तुझ्या कांता त्या माझिया घाता प्रवर्ततील ॥५॥
पुंडलिकासी तुवा दिधली आहे भाक | गोणाई म्हणे ठक बहु होसी ॥६॥
॥
