दोन प्रहर रात्र पाहो
1314.
दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते ॥१॥
अहो रखुमाबाई विठोबासि सांगा | भ्रतारासि का गा बेर्डे केले ॥२॥
वस्त्र पात्र नाही खाया जेवयासी | नाचे अहर्निशी निर्लज्जसा ॥३॥
चवदा मनुष्ये आहेत माझ्या | घरी हिंडती दारोदारी अन्नासाठी ॥४॥
बरा मार्ग तुम्ही उमजोनि सांगा | नामयाची राजा भली नव्हे ॥५॥
