ऐसे हरिचे दास हरिनाम
1290.
ऐसे हरिचे दास हरिनामी रंगले ।
हरीचि होउनी ठेले एकाएकी ॥१॥
आप पर तया न दिसेचि पाहता ।
विश्वी एकात्मता अवलोकीती ॥२॥
काम क्रोध लोभ मोह ममता माया ।
पळताती देखोनिया आशा तृष्णा ॥३॥
निळा म्हणे त्यांच्या दर्शनेंचि मुक्त ।
होताती पतीत महापापी ॥४॥
