पोर निर्दय जाले देवप
1291.
पोर निर्दय जाले देवपिसे लागले | लोकाचे गोविले तेंहि पोर ॥१॥
नित्य करी अंघोळी धोत्रेंहि फाडिली | कळी मांडियेली याही पोरे ॥२॥
गांवींचे महाजन करिती गुडघे स्नान या पोरा व्यसन अंघोळीचे ॥३॥
जन्मोजन्मी नेणो आम्ही ह्या तुळसी | या पोरे विवसी मांडियेली ॥४॥
गोणाई म्हणे नाम्या तुवा भले केले | जया वस्य केले विठोबासी ॥५॥
