कुलुप अगंळा घालोनि क
1305.
कुलुप अगंळा घालोनि कोठडिसी | घातले धोंड्याशी बंदीखानी ॥१॥
गोणाई दामासेठी नव्हती तेव्हा घरी गेली भीमातीरी स्नानालागी ॥२॥
नामदेव गेले राउळा त्वरित | सांगतसे मात केशवासी ॥३॥
दामासेठी आले स्नान करूनिया | राजाई त्या पाया लागुनि बोले ॥४॥
ऐका हो मामाजी पुत्राची हे मात | धोंडयाशी घरांत कोंडिले ॥५॥
दामासेठी बोले नामा कोठे गेला | बोलवा तयाला झडकरी ॥६॥
नारा महादा दोघे जाती राऊळासी बोलाविती नाम्यासी चला घरी ॥७॥
मुलाकडे पाहे केशवाच्या नामा घरी जाता दामा मारिल तो ॥८॥
देव म्हणे नाम्या भिऊ नको मनी | नाम है निर्वाणी तारिल तुज ॥९॥
नामा घरा आला दामासेठीपायी | नमस्कारूनि त्याही उभा पुढे ॥१०॥
दामासेठी म्हणे नाम्या काय केले | धोंडघाशी कोंडिले घरामध्ये ॥११॥
