ऐसे ऐकोनिया राजाई ते
1309.
ऐसे ऐकोनिया राजाई ते आली| रोषे येऊनि बोली बोलतसे ॥१॥
देवाने है दिले तुम्ही का पाठवा | काशाचा गणोबा बोलतसा ॥२॥
ऐसे बोलोनिया हाते लोटी धोंडा तुमचिया वितंडा कोण पुसे ॥३॥
देवे मज दिले तुम्ही का मागता | अलंकार आता घडीन मी ॥४॥
नामा म्हणे धन ज्याचे त्यासी द्यावे | आपुले ते घ्यावे आपणची ॥५॥
