माझा नामा मज देई | ज
1298.
माझा नामा मज देई | जीव देईन तुझे पायी ॥१॥
पुंडलिका भुलविले | तैसे माझे बाळ केले ॥२॥
ते गा न चले मजपासी दे गा माझ्या नामयासी ॥३॥
तुज संगती जे लागले | ते त्वा जितेंचि मारिले ॥४॥
विठ्ठल म्हणे गोणाई | आपुला नामा घेऊनी जाई ॥५॥
हाती धरोनिया गेली | गोणाई तेव्हा आनंदली ॥६॥
