क्षेत्री हा वृत्तांत
1310.
क्षेत्री हा वृत्तांत कळला सर्वांशी आले पंचक्रोशी सभोंवते ॥१॥
धोंडोबा गणोबा होते ज्याचे रानी ते आले धांवोनि मागावया ॥२॥
आपुले द्रव्य घ्यावे धोंडोबाशी द्यावे | नाही तरी चलावे पंचाइती ॥३॥
नामदेव म्हणे द्रव्य तुम्ही द्यावे | आपुले घेवोनि जावे धोंडोबासी ॥४॥
