वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १३, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१

एकी म्हणे भाव धरू ने

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074925 · अभंग क्र. ४५०

450.
एकी म्हणे भाव धरू नेदी मौन ।
तेथींचे वो ज्ञान सांगे ॥१॥
एकीने सांगितले दुजीने परिसिले ।
प्रपंच पुसले तेणे रूपे ॥२॥
ते घरटीकडी सोकरी बागडी ।
सोहं कथा उघडी पंढरीये ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीस मने ।
नयनासी पारणे देखतांची ॥४॥

अर्थ :
एक सखी, आपल्या मैत्रीणीला म्हणते हे सखे, श्रीहरि विषयीचा भाव मला मौन धारण करू देत नाही. दुसरी सखी म्हणते मला त्या परमात्म्याचे ज्ञान सांग, त्या परमात्म्याचा उपदेश एेकीन सांगितला. व दुसरीने एेकला. त्या उपदेशाचा प्रकार असा आहे की, उपदेश ऐकल्याबरोबर परमात्मभाव प्रगट होऊन संसार आपोआपच नाहीसा होऊन जातो. अशीहि परमात्मस्वरूपाची टेकडी ती बागडी म्हणजे सहज सोकरी म्हणजे स्वाधीन करून घेतली असता, सोह भाव प्रगट होतो. हा परमात्मभाव अगदी उघड आहे. हा प्रगट होण्याचे ठिकाण एक पंढरपूरच आहे. ३ त्या पंढरीस राहणारा श्रीविठ्ठल त्याला पाहताक्षणीच डोळ्याचे व मनाचे पारणे फिटून परमानंद प्राप्त झाला हे सर्व श्रीगुरू निवृत्तीरायांचे कृपेचे फळ आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग