पद्मपत्र जैसे उदकात
460.
पद्मपत्र जैसे उदकात असोन ।
लिप्त नव्हे जाण जेणेपरी ॥१॥
तैसाची तो आत्मा विश्वाकार भासे ।
ज्ञानियासी दिसे वेगळाची ॥२॥
दुधामाजी लोणी असोनी अलिप्त ।
नभ अखंडित घटी भासे ॥३॥
बहेणि म्हणे आत्मा वोळखिजे ऐसा ।
सद्गुरू-परेशा वोळंगूनी ॥४॥
