उत्तम स्थळ पंढरी देख
449.
उत्तम स्थळ पंढरी देखा । उभा सखां विठ्ठल ॥१॥
एकदां जा रे तये ठायी । प्रेमा उणें मग काई ॥२॥
भाग्य जोडले सर्व हाता । त्रैलोकीं सत्ता होईल ॥३॥
मोक्षामुक्ती तुम्हीपुढें । दास्यत्व घडे तयांसी ॥४॥
एका जनार्दनी त्याचे भेटी । सुखसंतोषा पडेल मिठी ॥५॥
