देहुडा चरणु वहातसे व
457.
देहुडा चरणु वहातसे वेणु | गोपिकारमणु स्वामी माझा ॥१॥
देखिला गे माय यमुनेचे तीरी | हात खांद्यावरी राधिकेच्या ॥२॥
गुंजावर्ण डोळे शिरी वावर झोटी | मयूरपिच्छ वेटि शोभतसे ॥३॥
सगुण मेघ: श्याम लावण्या सुंदर | नामया दातार केशवराज ॥४॥
