वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

वेदाचाआधार सर्वहीआश्

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076371 · अभंग क्र. ४५३

453.
वेदाचाआधार सर्वहीआश्रमा ।
वेदासी उपमा नाही खरी ॥१॥
यालागी प्रमाण सर्वाअंसी हा वेद ।
आश्रमासी वंद्य महावाक्य ॥२॥
वेद तेचि ज्ञान वेद तेचि ध्यान ।
वेद करी पावन वर्णमात्रा ॥३॥
वेत तोचि जप वेद तेचि तप ।
वेद तो स्वरूप आत्मयाचे ॥४॥
वेद तेचि तीर्थ वेद अनुष्ठान ।
वेद तो निर्वाण योगनिष्ठ ॥५॥
वेद तोचि योग वेद तोचि याग ।
वेद तो संयोग जीवात्मया ॥६॥
वेद तोचि भाव वेद तोचि देव ।
वेद तोचि ठाव सर्वज्ञते ॥७॥
बहेणि म्हणे वेद अमान्य जयासी ।
तया रौरवासी घडे जाणे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग