जन्मोजन्मीच्या सायास
453.
जन्मोजन्मीच्या सायासी ।
विठ्ठल लाधला पुंडलिकासी ॥१॥
पूर्वी पुण्य केले वो माये ।
विटे लाधले या विठोबाचे पाये ॥२॥
बापरखुमादेविवरू आहे ।
तया तीर्था केधवा जाती पाये ॥३॥
अर्थ :
अनेक जन्मीच्या पुण्याईमुळे मोठ्या कष्टाने पुंडलिकरायांना श्रीविठ्ठलाची प्राप्ती झाली. महान पुण्याईमुळे विटेवर श्रीविठ्ठलाचे चरण त्याला दिसले त्या पंढरी क्षेत्रास माझे पाय चालून केव्हा जातील व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल मी केंव्हा पाहिन असे माऊली सांगतात.
