वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

मुगुट कुंडले वनमाळा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088390 · अभंग क्र. ४५८

458.
मुगुट कुंडले वनमाळा ।
केशर कस्तुरीचा टिळा ॥१॥
विठो देखिला म्या दिठी ।
अंगी चंदनाची उटी ॥२॥
जडित कंकणे मुद्रिका ।
कासे पितांबर नेटका ॥३॥
कटी मेखळा विराजे ।
वाकी किंकणी तोडर गाजे ॥४॥
मुखलावण्याची खाणी ।
जैसा चंद्र पूर्णपणी ॥५॥
निळा म्हणे कटी कर ।
अंगकाति मनोहर ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग