सत्यसंकल्पाचा कर्ता
463.
सत्यसंकल्पाचा कर्ता जो विश्वाचा | अनाथा जीवांचा मायबाप ॥१॥
पुंडलिके तया आणिले रंगणी | कटावरी पाणि ठेवूनिया ॥२॥
अणुरेणुमाजि व्यापूनी राहिला | आनत्व जाहला एकलाचि ॥३॥
नामा म्हणे वेद त्यालागी बोभाय | जोडोनिया पाय ठाके उभा ॥४॥
