आरुपी रुपाचा विस्तार
462.
आरुपी रुपाचा विस्तार ।
अगुणी गुणांचा श्रृंगार ।
अनामी नामांचा बडिवार ।
सहस्त्रावरी विराजला ॥१॥
नाही अवतारा मर्यादा ।
अपार गुणांची संपदा ।
केली चरित्रे सच्चिदानंदा ।
कोण वर्णिता पुरेल ॥२॥
वृध्द तरुण नव्हती मुग्ध ।
सूक्ष्म स्थूळ ना अगाध ।
तरंग सागरींचे बुदबुद ।
नाही गणना त्या जैशी ॥३॥
अनंतरुपा मधुसूदना ।
जगत्रयव्यापका जनार्दना ।
योगिमानसमनोरंजना ।
अहो निधाना सुखमूर्ति ॥४॥
मुख मंडित सुंदर कर ।
कटी विराजले सुकुमार ।
चरणी ब्रीदाचा तोडर ।
रुळती असुर तया तळी ॥५॥
संत गर्जती स्वानंदे ।
कीर्त करिती ब्रम्हानंदे ।
नित्य करिती नाना छंदे ।
पढती ब्रिदे सुस्वरे ॥६॥
निळा म्हणे तया सुखा ।
नाही पार नव्हे लेखा ।
समाधि लागे सनकादिका ।
तो सोहळा देखोनी ॥७॥
