वेदे प्रतिपाद्य केले
449.
वेदे प्रतिपाद्य केले असे कर्म ।
मोक्षाचे हे वर्म पाहोनिया ॥१॥
परी ते नाणती करिता चुकले ।
तेणेचि पावले जन्म-मृत्यु ॥२॥
ब्रह्मचर्य आणि गृहस्थ वानप्रस्थ ।
आणिक संन्यास वेदमते ॥३॥
बहेणि म्हणे वेद बोलिला नेटके ।
क्रियेपाशी सुखे दुःखे येती ॥४॥
