अधरीचे अमृत सेविसी ए
459.
अधरीचे अमृत सेविसी एकला | काय पुण्य केले नेणो पावया ॥१॥
तुळशीच्या माळा शोभति गोपाळा | तयाहूनि आगळा पावया तू ॥२॥
सोळासहस्त्र गोपी बोलतील प्रौढी | अधरींची गोडी नेली तुवा ॥३॥
विष्णुदास नामा केशवी सौरस | उद्धरिला वंश पावया तुवा ॥४॥
