वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

उभा विटेवरी भक्तांचा

🙏 4. संत नामदेव · ABH-083682 · अभंग क्र. ४६२

462.
उभा विटेवरी भक्तांचा कैवारी।भेटाया उभारी दोन्ही बाह्या ॥१॥
गुण दोष त्याचे न पोहचि डोळा |भेटे वेळोवेळा केशिराज ॥२॥
ऐसा दयावंत घेत समाचार |लहान आणि थोर सांभाळितो ॥३॥
सर्वांलागी देतो समान दरुशन |उभा तो आपण सम पायी ॥४॥
नामा म्हणे तया संतांची आवडी |भेटावया कडाडी उभाची असे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग