वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

अंगाचिये सेज फणि छाय

🙏 4. संत नामदेव · ABH-083733 · अभंग क्र. ४४९

449.
अंगाचिये सेज फणि छाया धरी | सहस्त्रमुखी करी स्तुति शेष ॥१॥
परि तयाते तुझे चरित्र अकल्पित | तेथे माझे गीत कोणीकडे ॥२॥
कैशापरी तुज आम्ही ध्यावे देवा | हे वर्म केशवा सांग मज ॥३॥
मार्कंडेयो भृशुंडी लोमहर्ष अगस्ति | करिता तुझी स्तुति कल्प गेले ॥४॥
ध्यानी पाहता तुज न पवती योगी | तेथे मी तो रोगी कोणीकडे ॥५॥
ब्रह्मचर्यव्रत आचरती देव | ऋषिमुनि सर्व करिती सेवा ॥६॥
परि तुवा गर्व हरिला तयांचा | तेथे माझी वाचा कोणीकडे ॥७॥
इतुके ऐकोनि बाल केशिराज खुणे | आरुता येई म्हणे नामयासी ॥८॥
मुखी माझे नाम हृदयी धरुनि प्रेम | हेंचि तुज वर्म सांगितले नाम्या ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग