वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १३, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१

नेणो ब्रह्ममार्ग चुक

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074918 · अभंग क्र. ४५७

457.
नेणो ब्रह्ममार्ग चुकले ।
उघडे पंढरपुरा आले ।
भक्ते पुंडलिके देखिले ।
उभे केले विटेवरी ॥१॥
तो हा विठोबा निधान ।
ज्याचे ब्रह्मादिका ध्यान ।
पाऊले समान ।
विटेवरी शोभती ॥२॥
रूप पाहता तरी डोळंसु ।
सुंदर पाहता गोपवेषु ।
महिमा वर्णिता महेशु ।
जेणे मस्तकी वंदिला ॥३॥
भक्ति देखोनी लाचावला ।
जाऊ नेदी उभा केला ।
निवृत्तिदास म्हणे विठ्ठला ।
जन्मोजन्मी न विसंबे ॥४॥

अर्थ :
माऊली म्हणतात आज चुकून ते परब्रह्म प्रत्यक्ष पंढरपूरास आले असे वाटते. ते परब्रह्माचे रूप पाहून त्याला पुंडलिकरायांनी विटेवर उभे राहाण्यास सांगितले. तो हा विठोबा सर्वसुखाचा ठेवा असून ज्याचे ध्यान ब्रह्मदेवादिक करत असतात. अशी ती समान पाऊले विटेवर शोभत आहे. त्याचे रूप जाणते डोळस पुरूष पाहतात. त्याचे रूप गोपवेष धारण केलेले आहे. ज्याचे माहात्म्य एवढे आहे की, भगवान शंकर ज्याला वंदन करतो. तो परमात्मा पुंडलिकाच्या भक्तिला लाचावल्यामुळे पंढरपुरास आला. पुंडलिकरायांनीही त्याला दुसरीकडे कोठे न जाऊ देता विटेवर उभा केला. हे श्रीविठ्ठला तुला मी जन्मोजन्मी विसरणार नाही. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग