वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

निर्गुण निरामय संचले

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088471 · अभंग क्र. ४५३

453.
निर्गुण निरामय संचले ।
गुणीतीत रुपा आले ।
परात्पर ते सगुण झाले ।
उभे ठाकले विटेवरी ॥१॥
कोटी कंदर्पाच्या दीप्ति ।
विराजली अंगकांति ।
गुणलावण्याची संपत्ती ।
विठ्ठल मूर्ति गोजिरी ॥२॥
पहाताचि प्रवेशे अंतरी ।
मेनी मनाते मोहरी ।
चित्ती चैतन्याते भरी ।
देहभावा उरी उरो नेदी ॥३॥
जीवाचे हरुनिया जीवपण ।
नेदी उरो मी तू पण ।
वंदिताचि याचे चरण ।
करी बोळवण अहंकारा ॥४॥
निळा म्हणे भक्तपती ।
आला पुंडलिकाचिये आर्ती ।
अवघी जाणती नेणती ।
केली सरती पायांपे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग