संसारा आलिया जा रे प
454.
संसारा आलिया जा रे पंढरीपुरा । पाडुरंग सोयरा पहा आधी ॥१॥
पुरती मनोरथ इच्छिले ते सांचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥२॥
करिता स्नान भीमरथी तटीं । पुंडलीक दृष्टी लक्षुनियां ॥३॥
वेणुनाद गया पिडंदान फळ । गोपाळपूर सकळ देखिलिया ॥४॥
एका जनार्दनी सारांचेआं ते सार । पंढरी माहेर सकळ जीवां ॥५॥
