चुंबक चालवी लोखंडा प
459.
चुंबक चालवी लोखंडा प्रत्यक्ष ।
क्लेश हे तयास जेवी नाही ॥१॥
तेवी आत्मा सर्व करोनि अकर्ता ।
पाहे तू स्वचित्ता वोळखोनि ॥२॥
सूर्याचेनि जेवि भासे मृगजळ ।
जनक्रिया सकळ सूर्ययोगे ॥३॥
बहेणि म्हणे आत्मा ऐसा जया कळे ।
तयाचा मावळे जन्ममृत्यु ॥४॥
