पुजूनिया पुंडलिके ।
454.
पुजूनिया पुंडलिके ।
चरण अवलोकिले निके ॥१॥
तोहि जाणतो महिमान ।
ह्रदयी कवळिले म्हणवून ॥२॥
शेष जाणे शयन झाला ।
पद्मे उमटली तो शोभला ॥३॥
निळा म्हणे कुरवाळिता ।
कमळा पावली अर्घांगता ॥४॥
454.
पुजूनिया पुंडलिके ।
चरण अवलोकिले निके ॥१॥
तोहि जाणतो महिमान ।
ह्रदयी कवळिले म्हणवून ॥२॥
शेष जाणे शयन झाला ।
पद्मे उमटली तो शोभला ॥३॥
निळा म्हणे कुरवाळिता ।
कमळा पावली अर्घांगता ॥४॥