वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सत्य म्हणो जरी मायेस

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075932 · अभंग क्र. ४६३

463.
सत्य म्हणो जरी मायेसी तत्त्वता ।
तरीं निश्चितार्था असत्यची ॥१॥
न कळेचि पार इचा विधितिया ।
वेदान्ताही ठाया नये खरी ॥२॥
असत्य म्हणता प्रत्यक्ष दिसत ।
कोण इचा अंत घेऊ शके ॥३॥
बहेणि म्हणे वाचा खुंटली वर्णिता ।
कोण ता तत्त्वाचा शोध करी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग