वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १३, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१

शरीर हे स्थळ ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074920 · अभंग क्र. ४६३

463.
शरीर हे स्थळ ।
मळानिर्मळाचे मूळ ।
पाहोनी चौखाळ ।
आदिपुरुषासी ॥१॥
जन्ममरणाच्या उचटूनि पेडी ।
मग ये बिंवडी ज्ञान पिके ॥२॥
पंढरीचे पीक न समाये अंबरी ।
ते शेत सोकरी पुंडलिकु ॥३॥
ऐहिक्य परत्र दोन्ही शेतांची आउते ।
मुंड मुंड तेथे कुळवाडिये ॥४॥
उचलूनि पेंडी कासिया समूळी ।
मग पुण्यकाळी ओलवले ॥५॥
गरुडटके दोन्ही शेताची बुजावणी ।
दश कुडपणी नामघोष ॥६॥
एकवीस स्वर्गाचा घालूनिया माळा ।
मग ते गोपाळामाजी खेळे ॥७॥
जये शेती निवृत्ती भीतरे ।
तये शेती साजे पुरे ।
राऊळी निदसुरे दंडि जती ॥८॥
रात्री दिवस तुम्ही हरिचरणी जागा ।
तेणे तराल गा भवसागरु ॥९॥
अठराही बलौते ते केले धडौते ।
खळे दान देते सनकादिका ॥१०॥
ज्ञानदेव म्हणे जगदानी पिकला ।
पुरोन उरला पंढरिये ॥११॥

अर्थ :
शरीर हे स्थळ म्हणजे क्षेत्र, किंवा मळा म्हणजे जन्मरणादि दुःखरुपी संसाराचे तसेच निर्मळाचे म्हणजे मोक्षाचे अशी दोन्ही पिके करण्याचे मूळ म्हणजे क्षेत्र आहे त्यात शुध्द जो परमात्मा त्यास पाहिल्याने जन्ममरणाच्या मुळ्या, खोडे काढुन टाकून अशी ती जमीन बिवड केली असल्यामुळे त्या जमिनीत ब्रह्माचे पीक आले. असे ते पीक पंढरपूरात आले त्याचा काय नवलाव सांगावा ते आकाशात मावेनासे झाले. अशा सगळ्या शेतांची पिके नवलावा सांगावा ते आकाशात मावेनासे झाले. अशी शेतीची पिके गोळा करणारा पुंडलिक आहे. ऐहिक परत्र ही दोन्ही शेतांची औते आहेत. त्या औतांच्या साधनाने गरीब लोक शेती करणारे शेतकरी आहेत ? शेतातील निषिद्ध कर्माच्या वासना ह्याच कोणी त्या मुळा सकट काढुन शरीररुपी क्षेत्र स्वच्छ केल्यावर पुण्य कर्माच्या काळी ते चांगले ओलावले. संताच्या दिंडीत गरुडटके असतात. हीच कोणी त्या शेतांची बुजगावणी केली. संताचा जो नामघोष हीच कोणी दशदिशांची कुडपणी/ कुंपण होय. एकवीस स्वर्गाची माळा घातलेला परमात्मा वैष्णवांत खेळत आहे शरीररुपी शेतांत निवृत्ति अंतर्मुखता आहे. तेथे धान्याची रासरुपी शेतात परिपूर्ण आहे. शेताचे काम न करता स्वस्थ निजणारे जे घरांतआहेत. त्यांना दंड केला जातो. म्हणून तुम्ही रात्रंदिवस हरीचरणाचे ठिकाणी जागे राहा त्याने भवसागर तराल हो ! अशा तुमच्या भक्तीमुळे अठरा पुराणे हेच कोणी बलुतेदार संतोषतील. तसेच तुम्ही भक्ती करा असे दान मागण्यास आलेले सनकादिक हेही संतुष्ट होतील. सर्वाच्या इच्छेप्रमाणे दान देणारा एकच श्री पांडुरंगराय असून तो पंढरीस भक्तासांठी शिल्लक राहिला आहे. असे
निवृत्तीदास माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग