भवसिंधु तरावया ।
457.
भवसिंधु तरावया ।
भजावे राया पंढरीच्या ॥१॥
करील तोचि तरणोपावो ।
दाविल ठावे निजाचा ॥२॥
जेथे वाजता न लगे वारा ।
दिशा अंबरा शिवो नेदी ॥३॥
निळा म्हणे ऐसिये घरी ।
निजविल वोंवरी पर्यकी ॥४॥
457.
भवसिंधु तरावया ।
भजावे राया पंढरीच्या ॥१॥
करील तोचि तरणोपावो ।
दाविल ठावे निजाचा ॥२॥
जेथे वाजता न लगे वारा ।
दिशा अंबरा शिवो नेदी ॥३॥
निळा म्हणे ऐसिये घरी ।
निजविल वोंवरी पर्यकी ॥४॥