वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

न लगे करा खटपट । धरा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087233 · अभंग क्र. ४६१

461.
न लगे करा खटपट । धरा पंढरीची वाट । विठ्ठलीं बोभाट । अठ्ठहास्य करावा ॥१॥
धरा संतांचा समागम । मुखी उच्चारा रे नाम । जाते क्रोध आणि काम । दिगंतरीं पळोनीं ॥२॥
आशा मनशांचे काज । सहज दुर होते निज । घडता सहज । विठ्ठलचेअं दरुशन ॥३॥
एका जनार्दनी मन । राखा पायी ते नेमून । काया वाचा शरण तया पदी होईजे ॥१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग