वेदा ऐसी नाही माउली
450.
वेदा ऐसी नाही माउली आणिक ।
प्राणिया विवेक सांगितला ॥१॥
परी ते नेणती वेदार्थीचे वर्म ।
चुकोनिया कर्म आचरती ॥२॥
वेदा ऐसा कैचा बाप या जगासी ।
कर्मेचि मोक्षासी पाववितो ॥३॥
बहेणि म्हणे वेद मोक्षाचे कारण ।
परी क्रिया जाण पाहिजे ते ॥४॥
