वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १३, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१

आनु नेणे काही ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074924 · अभंग क्र. ४५४

454.
आनु नेणे काही ।
विठ्ठलु स्मरे देहभावी ॥१॥
पुंडलिका हे चिंतन ।
म्हणोनी विटेवरी हे ब्रह्म ॥२॥
रखुमादेविवरू शहाणे ।
विठ्ठलु पाहुणे पुंडलिक ॥३॥

अर्थ :
माझा देहभाव जाण्याकरिता मी त्या विठोबारायाच्या स्मरणाशिवाय दुसरे काहीच करीत नाही. पुंडलिकरायांला या श्रीविठ्ठलाचा सतत ध्यास लागल्यामुळे वेदशास्त्राची खूण जे ब्रह्मस्वरूप तेच श्रीविठ्ठलाच्या रूपाने येऊन उभे राहिले म्हणून शहाण्या पुरूषाने इतर काही एक न चिंतन करता एका श्रीविठ्ठलाचे चिंतन करावे त्यामुळे पुंडलिकरायाप्रमाणे त्यालाही माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठलांची प्राप्ती होईल असे माऊली म्हणतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग