वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सत्यासत्यातीत मायेसी

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076437 · अभंग क्र. ४६४

464.
सत्यासत्यातीत मायेसी म्हणता ।
आलीसे तत्वता नागवण ॥१॥
बीजेविण वृक्ष की द्विजेविण पक्ष ।
वळेविण दक्ष केवी घडे ॥२॥
सूर्याविण रश्मी जळेविण तरंग ।
पुष्पेविण भृंग केवी पाहे ॥३॥
बहेणि म्हणे माया सत्य ना असत्य ।
दोहीसी अतीत केवी घडे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग