काष्ठामाजी अग्न जैसा
457.
काष्ठामाजी अग्न जैसा असे गुप्त ।
आत्मा सर्वगत तैसा असे ॥१॥
विवेके करूनी पडिजेल ठायी ।
महावाक्य पाही शोध लागे ॥२॥
जळीं सूर्यबिंब दिसतसे जैसे ।
आत्मत्व हे तैसे वोळखावे ॥३॥
बहेणि म्हणे आत्मा सर्वही व्यापक ।
परी तो निष्ठंक वेगळाची ॥४॥
