वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

वेदा नकळे पार श्रुति

🙏 4. संत नामदेव · ABH-083742 · अभंग क्र. ४५१

451.
वेदा नकळे पार श्रुतिसी गव्हार | उपनिषदा सार नकळेचि ॥१॥
तो हरि गोकुळी वसुदेवा कुळी | यशोदेजवळी बाळकृष्ण ॥२॥
ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती | शास्त्रांसी तो गति नकळेचि ॥३॥
योग्यांचे चिंतन मुनीचे अंजन | शेषादिका ध्यान सदा ज्यांचे ॥४॥
पुराणे भागली आचारे श्रमली | बोलता राहिली साधुवृंदे ॥५॥
नामा म्हणे तो हा विठ्ठल पंढरी | नाम मात्रे तरी सकळांसी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग