वेदार्थ-विचारे आत्मा
455.
वेदार्थ-विचारे आत्मा दुरी नाही ।
सर्वांतरी पाही वोतप्रोत ॥१॥
परी ते नेणती कल्पनेचे योग ।
इंद्रियांच्या संगे भ्रांत झाले ॥२॥
आकाश व्यापक जैसे असे सर्वा ।
आत्मत्व अनुभवा तयापरी ॥३॥
बहेणि म्हणे जसे अलंकारी सोने ।
आत्मा तेचि खुणे वोळखावा ॥४॥
