जेणे आणियेली क्षिती
449.
जेणे आणियेली क्षिती ।
रसातळींहुनी वरती ॥१॥
तो हा उभा कृपावंत ।
ठेवुनी कटांवरी हात ॥२॥
ज्याचे नाभीकमळींहून ।
जन्म पावे चतुरानन ॥३॥
निळा म्हणे कमळा नारी ।
ज्याचे चरणी वास करी ॥४॥
449.
जेणे आणियेली क्षिती ।
रसातळींहुनी वरती ॥१॥
तो हा उभा कृपावंत ।
ठेवुनी कटांवरी हात ॥२॥
ज्याचे नाभीकमळींहून ।
जन्म पावे चतुरानन ॥३॥
निळा म्हणे कमळा नारी ।
ज्याचे चरणी वास करी ॥४॥