वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › १. सार्थ अभंग १ ते ५००

जेवी नवज्वरे तापले श

🙏 3. संत तुकाराम · ABH-077598 · अभंग क्र. ४५०

450.
जेवी नवज्वरे तापले शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥
तेवी परमार्थ जीही दुराविला । तयालागी झाला सन्निपात ॥धृपद॥
कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥२॥
तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥३॥

अर्थ :
संत तुकाराम महाराज म्हणतात ज्याला नवज्वर (तीव्र ताप) झाला आहे, त्याला दूधसुद्धा विषासारखे वाटते. (१)
तसाच ज्याने परमार्थ (ईश्वरमार्ग) दूर लोटला आहे, त्याची अवस्था सन्निपातासारखी (गंभीर व्याधीसारखी) होते. (धृपद), ज्याच्या डोळ्यांवर कामिनीचा (वासनेचा) प्रभाव झाला आहे, त्याला चंद्रसुद्धा पिवळा (विकृत) दिसतो. (२) तुकाराम महाराज म्हणतात —ज्याला मद्यपानाची सवय लागली आहे, त्याला लोण्याची (नवनीताची) गोडी आवडत नाही. (३)

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग