ऐसे जाणोनिया श्रीहरि
83.
ऐसे जाणोनिया श्रीहरि ।
पालखी निजविल्या रुदन करी ।
न राहे अंकीही क्षणभरी ।
निविता शेजारी तैसाची ॥१॥
काय करु गे यशोदा म्हणे ।
का हे करितीहे रुदने ।
दिठावले माझे तान्हे ।
निंबलोण उतरी तया ॥२॥
तरी न राहे रुदता ।
अधिक् अधिक् आक्रंदता ।
यशोदा म्हणे बाहेरी आता ।
नेऊ तरी कोणाकडे ॥३॥
मग घेऊनिया कडियेवरी ।
काग दाविला निंबाबरी ।
तया देखोनिया हास्य करी ।
मग ते सुंदरी हरिखली ॥४॥
म्हणे निजऊनिया येथे ।
करीन कामकाज ऐसे ।
विचारुनिया चित्ते ।
म्हणे कागाते अवलोकी ॥५॥
ऐशापरी निजविला ।
क्षण एक काजकामी गेला ।
तव काग तेथूनिया उठविला ।
झडपू आला गोविंदा ॥६॥
देखोनी यशोदा घाबरी ।
हाहाकार केला इतरी ।
निळा म्हणे तो असूरी ।
हरीचीवरी झेपावला ॥७॥
