जेथे पुसो जावे तेथे
85.
जेथे पुसो जावे तेथे अभिमान ।
आपुलेचि ज्ञान प्रतिष्ठी तो ॥१॥
जाणोनि अंतरी न सांगती कोणी ।
कोणाचे वचनी स्थिर राहो ॥२॥
लय हे लक्षण सांगती धारणा ।
नाना उपासना नाना मंत्र ॥३॥
एक ते संगती पंचमुद्रा जप ।
एंव खटाटोप आसनाचा ॥४॥
एक ते सांगती तीर्थे तपे व्रत ।
एक ते अनंत पूजाविधि ॥५॥
बहेणि म्हणे आता नव्हे स्थिर मन ।
जेथे तेथे गुण अविद्येचा ॥६॥
