वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ३, नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९

दसविये द्वारी वोहट प

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075203 · अभंग क्र. ८५

85.
दसविये द्वारी वोहट पडिला ।
नेणता पै गेला पहावया ॥
अवचिती वाट सांपडली पंथे ।
ब्रह्मनाम तेथे आले हाता ॥
ज्ञानदेवा गीती निशाणी नाम ।
समाधि संजीवनी तारक हरि ॥

अर्थ :
दहा इंद्रियांची दहा द्वारे ओस पडली व त्याला पहायला मन धावले. ते ब्रह्मनाम अवचित कळले व निजपंथाची वाट सापडली. ते नामच संजिवन समाधी पर्यंत पोहचवते तेच नाम मी गात आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग