वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

वरिले उपरि उभे राहुन

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080947 · अभंग क्र. ८५

85.
वरिले उपरि उभे राहुन हरि । वेणु वाजवी नाना परि रे कान्हया ॥
पवयाचा नाद गोपिंकाचे कानी । तयामाजी धन्य रखमाई रे कान्हया ॥
भावार्थ मोठा तरीच वाटा । अर्धांगी शोभे रखमाई रे कान्हया ॥
सकळा मिळोनि प्रीतिया लाविती । रखुमाईचा पती रे कान्हया ॥
अवघी मिळेनी बेदाद झाला । रखुमाईने अंती नेला रे कान्हया ॥
साही आती अठरा चारी ह्या भांडती । न कळे तयाची कोण गती रे कान्हया ॥
बोधला म्हणे रखुमाई । कृपाळु जाली आम्हा पाही रे कान्हया ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग