वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › २, हरिपाठ अभंग ५८ ते ८४

एक तत्व नाम दृढ धरी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074949 · अभंग क्र. ८३

83.
एक तत्व नाम दृढ धरी मना ।
हरीसी करुणा ये‌ईल तुझी ॥१॥
ते नाम सोपे रे राम-कृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद जपे आधी ॥२॥
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।
वाया आणिका पंथा जासील झणी ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी ।
धरोनी श्रीहरि जपे सदा ॥४॥

अर्थ :
एकतत्व असणारे नाम सतत दृढतेने घेतले तर हरिला त्या जीवाची करुणा येते. ते नाम घेणे हे सहज सोपे आहे परंतु जिव्हेवर सतत ते घेतले पाहिजे. नामाशिवाय अन्य दुसरे तत्व नाही दुसरा पंथ दुसरे तत्व नाहीच. मी सतत मौनात जपमाळ अंतरात श्रीहरीचे नाम जपत असतो असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग