पंढरपुर पाटणी गा महा
86.
पंढरपुर पाटणी गा महाराज सार्वभौम । पांडुरंग दीनबंधु जयाचे ते नाम ॥१॥
आंधळ्या जीवींचे तो गा जाणतो धर्म । म्हणोनि आलो गा देई माझे मज वर्म ॥२॥
असोनि हात पाय डोळा जाहालो मी आंधळा । मुखी नाम तुझे लागला वाचेसी चाळा ॥३॥
देऊनि दान माते नाम सांगे ये काळी । विठोबाचे दान आले ऐसी देईन आरोळी ॥४॥
दान पावले संतसंगे भक्तीचे । एका जनार्दनी अखंड नाम वाचे ॥५॥
